तो येतोय....
तो येतोय अगदी जवळ आलाय... काय मग काही ठरवलं का नाही ? काय करायचं ते.. नाही अजून अहो मग लागा कि तयारीला नाहीतर ऐन वेलेला उगीच पंचाईत व्हायची तुमची . . अहो काय म्हणून काय विचारताय अजूनही नाही कळलं का ? संत व्हॅलेंटाईन महाराज दिन जवळ येतोय.. म्हणजेच आपला Valentine Day Valentine Day म्हणजे प्रेमाचा दिवस. खरतरं प्रेमाचा असा एक Specific दिवस नसतो. पण आपण आता पूर्णपणे पाश्यात संस्कृती स्वीकारली म्हंटल्यावर हे सगळ आलचं. असो आता संकृती वैगरे विषयावर लिहायला गेले तर आपला मूळ विषय उगीच भरकटेल. सध्या आपण Valentine Day वर focused क रूया आधी तर ज्याचं जूळलयं त्याचं असचं आयुष्यभर जुळून राहूदे, आणि ज्याचं जुळायचं बाकी आहे त्याचं या वर्षी तरी जुळूदे अशी त्या व्हॅलेंटाईन बाबा कडे प्रार्थना. वर्षभर लपून प्रेम करणारे या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात. यातल्या काहीजणांवर संत व्हॅलेंटाईन बाबा खुष होऊन होकाराचा आशीर्वाद देतात. तर काहींवर संत व्हॅलेंटाईन बाबाचा कोप होऊन काहींना शिव्या , शाप तर काहींना सरळ दिवसा तारे दिसतात. असो पण या द...