Posts

Showing posts from 2018
Image
नवरात्रीचे नऊ दिवस संपले की, चाहूल लागते ती दसर्याची. नऊ दिवसाची लगबग थोडीशी कमी होते, आणि उजाडतो दसर्याचा दिवस. दसर्याचा हा दिवस प्नत्येकजण आपापल्या पध्दतीने साजरा करत असतो. यांत्रिकीकरण झालेल्या या युगात पुर्वीसारखा लहान मुलांमध्ये दसर्याचा उत्साह दिसून येतं नाही. काय मग मुलांनो जाणून घ्यायचयं का कसा साजरा व्हायचा दसर्याचा सण? चला तर मग...      दसर्याच्या दिवशी सकाळी सकाळी  झेंडूच्या फुलाचे तोरण घराला, दरवाजाला लावले जायचे, मग सगळ्या देवांची पुजा करून, घरातील हत्यारांची, सरस्वतीची पूजा केली जायची. यावेळीस लहान मलांच्या व'ा पुस्तकांना देखील पुजण्याची आपल्याकडे पध्दत असते, त्यामुळे ईतर दिवशी वह्या पुस्तकांना कंटाळलेली हि चिल्ली-पिल्ली दसर्याच्या दिवशी मात्र या व'ा पुस्तकांसमोर हात जोडून उभे राहताना दिसून यायची. या शुभ प्नसंगी वहिवर सरस्वतीचे चित्र काढून, त्यासोबत आपट्यांच्या पानांची पुजा देखील ही मुले अगदी मनोभावे करताना त्यांच्या चेहर्यावरील भाव अगदी निरागस असायचे. मुलांनो या दिवशी आपट्यांच्या पानांना सोनं असे संबोधले जाते. आपट्याची पानं नव्हे तर सोनं घरी...

रिअ‍ॅलिटी शो आणि......?

Image
  हल्ली प्नत्येक टी. व्ही चॅनलवर एकतरी रिअ‍ॅलिटी शो असतोच. रिअ‍ॅलिटी शो नावाच भूत आपल्या मानगुटीवर बसून बराच काळ लोटला. एका केलेल्या सर्वेक्षणानुसार हिंदी मराठी आणि अन्य प्नादेशिक वाहिन्यांवर संगीत, नृत्य, विनोद, अभिनय, साहस अशा वेगवेगळळ्या संकल्पनावर आधारित रिअ‍ॅलिटी शो सुरु आहेत. आजच्या प्नेकक्षकवर्गचा कल जास्तीत जास्त रित्या रिअ‍ॅलिटी शो बघण्याकडेच असतो. डेलिसोपच्या रांगेतुन बाहेर पडून रिअ‍ॅलिटी शो मध्ये काहितरी वेगळं, आणि हटके पाहायला मिळेल या उद्देशाने रिअ‍ॅलिटी शो बघण्याकडे प्नेक्षकांची गर्दी ासते आणि या गर्दीतील मुख्य वयोगट म्हणजेच आजची तरुणाई.    रिअ‍ॅलिटी शोची सुरवात होते ती म्हणजे त्याच्या आॅडिशन पासून मग तो डान्सचा शो असो किंवा गाण्याचा. आॅडिशन पासूनच सगळ चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळत. तेही अगदी एकरूप होऊन. आता तुम्हीच सांगा कि तिथे येणार्या प्नत्येकाचं चित्रीकरण हे दिड तासाच्या एका भागात होणं कसं शक्य आहे? तुम्ही जर आॅडिशनच्या भागावर बारकाईने लक्ष दिले तर मध्ये येणारे स्पर्धक जे असतात जणू काही ते स्वत:च हसू करायाला आल्यासारखे वागत असतात. आता हि गोष्ट वि...

स्वातंत्र कि पारतंत्र्य

देश स्वातंत्र्य होऊन ईतका काळ लोटला तरी अजूनही पारतंत्र्याच्या विळख्यात अडकल्याची भावना मनात येते. अर्थात आता ह्याला कारणे देखील तशाच प्नकारची आहेत. देशाला स्वातत्र...

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला

Image
वृत्तपत्र हे एका आरशापेक्षा कमी नसते. जगातील कानाकोप-या पासुनची इतंभूत माहिती यामध्ये वाचायला मिळते. म्हणूनच या माध्यमाला समाजाचा आरसा असे म्हटले जाते. या माध्यमाध्ये ईतर माध्यमांपेक्षा समाज बदलण्याची जास्त ताकद असते. पूर्वी एकच वृत्तपत्र एकाच जागी वाचायला मिळे, परंतु आत्ता जेवढ्या भाषा तेवढी वृत्तपत्रे अशी परिस्थिती पाहायाला मिळते. प्नादेशिक आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे जागरुक व चोखंदळ वाचक वाचताना दिसू न येतात.   सध्या अनेक भाषांतील वृत्तपत्र असल्याची आपल्याला दिसून येतात. आणि या वृत्तपत्राचा वाचक वर्ग देझील वेगवेगळा असतो. आपला वाचगवर्ग टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपल्या वृत्तपत्राकडे जास्ती जास्त वाचकवर्ग खेचण्यासाठी पत्रकाराला नाना प्नकारचे प्नयत्न करावे लागताता. त्यातील एक म्हणजे जाहिराती.. पूर्वी वृत्तपत्रामध्ये एखाद दुसरी जाहिरात असायची परंतु सध्या काळात संपूर्ण पानभर जाहिराती देण्याचा ट्रेंड सुरु आहे. वृत्तपत्राच्या खपासाठी जाहिरातींवा घेतलेल्या आधाराचा काही वेळेला अतिरेक होताना दिसतो. जाहिरातींमुळेच वृत्तपत्राच्या पानांची संख्या अवाचा थवा होऊन जाते. जाहिरातींचे कॉल्मस ...

रिमेक्सची प्लॉप हवा...

हल्ली रिमेकची हवा जोरदार सुरु आहे. एखादा चित्रपट प्नेक्षकांच्या पसंतीस उतरला कि वेगवेगळ्या भाषांत या चित्रपटांच्या रिमेकचा विचार केला जातो. पण त्या सिनेमांच्या कथान...

बातमी थोडी आणि सोंगं फार

   आपल्या मराठी साहित्यात अनेक म्हणी या आहेत, त्यातील एक म्हणेज रात्र थोडी आणि सोंगं फार.. परंतु सध्या माध्यमांधील परिस्थिती बघता या म्हणीचे थोडे विडंबन केले तर बातमी थो...

SEX आणि समाजाचा दृष्टीकोन..

Image
      " SEX" हा शब्द चार चौघात उच्चारला तरी आजूबाजूची माणसं पाप केल्यासारखं तोंडाकडे बघत बसतात . आणि जर एखाद्या मुला - मुलीने लग्नाआधी सेक्सचे संबंध ठेवले असतील तर काही विचारायलाचं नको . शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि ते संबंध पवित्र आहेत हे ठरवण्यासाठी लग्न करावं लागतं. आणि मग तेच संबंध पवित्र असं आपण म्हणतो .       लग्नाला एक वर्ष देखील पूर्ण न होता त्या जोडप्याला जेव्हा मुलं होणार हे समजल्यावर ती गोष्ट आनंदाची मानली जाते . आणि ते नैतिक देखील ठरवलं जातं. पण तेच एखादा मुलगा आणि मुलगी सलग पाच ते सहा वर्ष Relationship राहून त्यांनी संबंध ठेवले तर ते नितीविरुद्ध आहे असा Tag लाऊन आपला समाज मोकळा होतो . म्हणजेच लग्नासारख्या सो कॉल्ड पवित्र मानल्या जाणाऱ्या बंधनात मनं जुळलेली नसतानाही शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी असते. अशी आपल्या समाजाची मानसिकता आहे .     Sex हि खूप सुखद आणि आनंद देणारी गोष्ट पण त्याला आपण पवित्र अपवित्र यासारख्या संकल्पनेत का बसवतो? आपण पाश्यात संकृती स्वीकारली आहे अस म्हणतो. मग या एका मुद्यावर आलो कि क...

शुभ मंगल "सावधान"

Image
डोक्यावर अक्षता पडण्याच्या वेळी म्हटलं जाणारं शुभ मंगल सावधान का म्हटलं  जातं. ' सावधान म्हणजे पुढे धोका आहे जाऊ नये हा असाच असतो.   एकप्रकारचा तो ईशारा असतो. तरीही आंतरपाटाच्या दोन बाजूंना असणारे ते दोघेही भटजींचा हा मंत्र अगदी हसतमुख रित्या ऐकत असतात . भटजी जणू   शक्य तितक्या कठोर , रुक्ष , मोठ्या स्वरात ' सावधान ' उच्चारून   ईशारादेत असतो. पण त्या दोन व्यक्तींना आनंदाच्या आणि कौतुकाच्या माहोल मध्ये काही समजून येत नाही. आणि नकळत ते दोघेही   हव्या हव्याश्या वाटणाऱ्या No Entry मध्ये प्रवेश करतात .      सुरवातीला सगळं छान अगदी मराठी चित्रपटातात दाखवतात ना तसं नजर लागण्याजोगं. पण जस चिंगम चघळून त्याची साखर संपून जाते त्याप्रमाणे नवीन लग्नसराई जुनी होत गेली कि तिच्यातली गोडी कधी हवेत विरून जाते त्या दोघांनाही   कळतं नाही मग रोमियोचा होतो   हिटलर आणि त्या ज्युलीएट ची होते दुधारी.   तेव्हा त्या तेव्हा त्या दोघांनाही आठवतो भटजीने म्हटलेला तो मंत्र “ शुभ मंगल सावधान ”            तुझ्या...

"M" For "Miड्ल क्लास"

      एक तर माणसानं गरीब तरी असावं  किंवा खूप श्रीमंत तरी असावं पण मिड्ल क्लास मात्र असू नये. कारण मिड्ल क्लास लोकांची परिस्थिती म्हणजे म्हणजे अवघड जागेच दुखण जे सांगताही येत नाही आणि लपवता देखील येत नाही. गरीब भिक मागून गुजारा करतो. आणि आपल्या श्रीमंतांचे तर थाटाचं वेगळे.  पण तरीही कितीही आणि काहीही झालं तरी Miड्ल क्लास माणूस हा बेस्टच असतो कस ते आपण पाहूया        हो कारण त्याला आवडतं मांडी मारून जेवण्याच्या पंगतीत बसायला, त्याला आवडतं ट्रेनच्या गर्दीत रोज लटकायला. तो एकाचवेळी अनेक गोष्टी करतो, एकीकडे भिकाऱ्याला चिल्लर तर दुसरीकडे, अंबानीच्या संपत्तीची चर्चा करत असतो .रोज डब्यातली बटाट्याची भाजी खाऊन तो कंटाळतो, पण तोच पावा मधला बटाटावडा मात्र आवडीने खातो. त्याला काट्या चमच्याने  खाणे जमतच नाही कारण आपल्या पाच बोटांशिवाय त्याची भूक कधी भागत नाही. घरी आल्यावर आपल्या बायका मुलांवर चीड-चिड करण म्हणजे त्याचा जन्मसिद्ध हक्कच असतो, पण त्याचं लोकांसाठी काय करता येईल याचा विचार मात्र तो सतत करत बसतो. थोडीशी घासाघीस केल्याशिवाय त्याची कधी खर...

तो येतोय....

Image
  तो येतोय अगदी जवळ आलाय... काय मग काही ठरवलं का नाही ? काय करायचं ते.. नाही अजून अहो मग लागा कि तयारीला   नाहीतर ऐन वेलेला उगीच पंचाईत व्हायची तुमची . . अहो काय म्हणून काय विचारताय अजूनही नाही कळलं का ? संत व्हॅलेंटाईन महाराज दिन जवळ येतोय..   म्हणजेच आपला Valentine Day Valentine Day म्हणजे प्रेमाचा दिवस. खरतरं प्रेमाचा असा एक Specific दिवस नसतो. पण आपण आता पूर्णपणे पाश्यात संस्कृती स्वीकारली म्हंटल्यावर हे सगळ आलचं. असो आता संकृती वैगरे विषयावर लिहायला गेले तर आपला मूळ विषय उगीच भरकटेल. सध्या आपण Valentine Day वर focused  क रूया       आधी तर ज्याचं जूळलयं त्याचं असचं आयुष्यभर जुळून राहूदे, आणि ज्याचं जुळायचं बाकी आहे त्याचं या वर्षी तरी जुळूदे अशी त्या व्हॅलेंटाईन बाबा कडे प्रार्थना. वर्षभर लपून प्रेम करणारे या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात. यातल्या काहीजणांवर संत व्हॅलेंटाईन बाबा खुष होऊन होकाराचा आशीर्वाद देतात. तर काहींवर   संत व्हॅलेंटाईन बाबाचा कोप होऊन काहींना शिव्या , शाप तर काहींना सरळ दिवसा तारे दिसतात. असो पण या द...

कॉफीचे थेंब...

Image
लहानपणापासून आईने चहा प्यायाची सवय लावली. ती सवय आजतागायत तशीच... त्यामुळे  कॉफी वैगरे पिण्याच्या फंदात मी कधी फारसे पडलेच नाही. आणि मुळात म्हणजे कॉफी वैगरे म्हंटल म्हणजे हे सगळे मोठ्या लोकांचे चोचले असच वाटत राहायचं नेहमी..     पण त्या दिवशी सकाळी अचानक आईने कॉफीचा मग समोर ठेवला आणि चहाची इतकी सवय लागली आहे कि आता त्या वासावरूनच कळलं कि आज रोजपेक्षा काहीतरी वेगळ आहे. म्हणून मी तो मग हाथात घेऊन पहिला तर त्यात वाफाळणारी कॉफी होती. सिगारेटचा धूर निघत असल्यासारखा गरम वाफा येत होत्या त्या कॉफीच्या मगमधून...    मग मी देखील कॉफीचा मग बघून  आपला laptop काढला. आणि एका हाथात कॉफीचा मग आणि मांडीवर laptop घेऊन ऐटीत सोफ्यावर बसले.  काही वेळानंतर खट खट खट खटाखट खट बटनांच्या आवाजा सोबत टाईपिंगच्या वेगाने डूलणारा laptop आणि कॉफीच्या नशेत धुंद असल्यासारखी मी त्या क्षणी वावरत होते. काहीतरी लिहण्याचा प्रयन्त करत होते. जे मनात येत होतं ते सगळ laptop च्या स्क्रीनवर उमटत होतं. त्या क्षणी माझ्या मनाचे प्रतिबिंब जणू त्या laptop ची स्क्रीनच बनली होती. आधी कधीही कॉफी...

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

Image
लहानपणी मृगजळ म्हणजे बालभारतीच्या पुस्तकातील वाळवंट आणि मृगजळाच्या आशेमागे धावणारी ती हरीण . एवढाच काय तो त्या मृगजळाचा अर्थ माहित. त्यात आपण सगळे ठरलो मुंबईतले. आणि मुंबई म्हणजे आजकाल तर पावसाचे चार महिने सोडले तरी वर्षभर हा पाऊसच असतो . त्यामुळे वाळवंट फक्त आपल्याला चित्रपटापुरतच काय ते ठाऊक . कारण जिथे  वाळवंट माहित नाही तिथे मृगजळ समजणे थोड अवघड जाणारच . पण जसे जसे मोठे होत गेलो तस तसे नव्याने मृगजळाचा अर्थ उलघडत गेला .          मृगजळ म्हणेज भास , आभास. मग थोड मागे गेल्यावर अस कळलं कि ; लहानपणी बाबा परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर एखादी नवीन गोष्ट घेऊन देणार असे Promise करायचे आणि ती वस्तू यायच्या आधीच त्या वस्तूविषयीचे भास हे सतत होत रहायचे. आणि मग ती वस्तू मिळवण्यासाठी खूप अभ्यास करायचा आणि त्या पुस्तकातल्या हरणासारखं त्या मृगजळा परी भासणाऱ्या वस्तूमागे धावत राहायचं..     मग थोड मोठं झाल्यावर म्हणजेच कॉलेजमद्ये आल्यावर मृगजळाचा अर्थ नव्याने कळू लागला . कॉलेज म्हणजे सळसळणार रक्त , मनात एक प्रचंड उर्जा आणि काहीतरी करून दा...