तो येतोय....

 तो येतोय अगदी जवळ आलाय... काय मग काही ठरवलं का नाही? काय करायचं ते.. नाही अजून अहो मग लागा कि तयारीला  नाहीतर ऐन वेलेला उगीच पंचाईत व्हायची तुमची.. अहो काय म्हणून काय विचारताय अजूनही नाही कळलं का? संत व्हॅलेंटाईन महाराज दिन जवळ येतोय..  म्हणजेच आपला Valentine Day Valentine Day म्हणजे प्रेमाचा दिवस. खरतरं प्रेमाचा असा एक Specific दिवस नसतो. पण आपण आता पूर्णपणे पाश्यात संस्कृती स्वीकारली म्हंटल्यावर हे सगळ आलचं. असो आता संकृती वैगरे विषयावर लिहायला गेले तर आपला मूळ विषय उगीच भरकटेल. सध्या आपण Valentine Day वर focused  करूया


     आधी तर ज्याचं जूळलयं त्याचं असचं आयुष्यभर जुळून राहूदे, आणि ज्याचं जुळायचं बाकी आहे त्याचं या वर्षी तरी जुळूदे अशी त्या व्हॅलेंटाईन बाबा कडे प्रार्थना. वर्षभर लपून प्रेम करणारे या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात. यातल्या काहीजणांवर संत व्हॅलेंटाईन बाबा खुष होऊन होकाराचा आशीर्वाद देतात. तर काहींवर  संत व्हॅलेंटाईन बाबाचा कोप होऊन काहींना शिव्या , शाप तर काहींना सरळ दिवसा तारे दिसतात. असो पण या दिवसाची हि मज्जा देखील  वेगळीच असते. प्रेमामध्ये  PHD केलेल्यांनी तर खास या दिवसासाठी मंत्र रचून ठेवला आहे. “ओम संत  व्हॅलेंटाईन बाबा यनम:”  असा या मंत्राचा महिनाभर मनोभावे उच्चार  केल्यास याची प्रचीती १४ फेब्रुवारीला जरूर येईल.  

     पण विनोदाचा भाग सोडला तर,  प्रेम हि भावना खूप सुंदर आहे. मग ते प्रेम कोणावर हि असुदे. फक्त एक मुलगा आणि मुलगी हि एकमेकांचे व्हॅलेंटाईन नसतात. तर एक मुलगा- आई , बाप- मुलगी, हे दोघ देखील एकमेकांचे व्हॅलेंटाईन होऊ शकतात आणि खरतरं असायला हवेत. आणि तस बघायला गेलं तर आपल्या आयुष्यातले आपले पहिले व्हॅलेंटाईन हे आपले आई बाबाचं असतात. त्यामुळे या वर्षी एक गुलाब तिला किंवा त्याला देण्याआधी आई बाबांना देऊन बघूया कदाचित या वर्षीचा Valentine Day आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जाईल.

  "बाकी त्या दिवशी सगळं सांभाळायला आपले संत                    व्हॅलेंटाईन बाबा आहेतच"🙏
#valentineday #gifts #love     

      

Comments

  1. विषय माझ्या आवडीचा 😄 छान! खुप वेगळ्या पद्धतीने मांडला आहेस विषय keep it up 👍

    ReplyDelete
  2. Khup bhari... Vinodi plus khi tri moral... Khup chan julavlays.....

    ReplyDelete
  3. Khup khup khup ch bhari concept mandlays shru khr ch aatta chya pidhi laa asa krnyachi garaj aahe. Khup chan mandlays tu. Apratim khup aavdla specially last paragraph😊😍😘

    ReplyDelete
  4. खुप छान आणि जवळचा विषय ..

    ReplyDelete
  5. Ho saglyana cha excitement ahe ani he hota cha..mst

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

शुभ मंगल "सावधान"

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला