Posts

Image
नवरात्रीचे नऊ दिवस संपले की, चाहूल लागते ती दसर्याची. नऊ दिवसाची लगबग थोडीशी कमी होते, आणि उजाडतो दसर्याचा दिवस. दसर्याचा हा दिवस प्नत्येकजण आपापल्या पध्दतीने साजरा करत असतो. यांत्रिकीकरण झालेल्या या युगात पुर्वीसारखा लहान मुलांमध्ये दसर्याचा उत्साह दिसून येतं नाही. काय मग मुलांनो जाणून घ्यायचयं का कसा साजरा व्हायचा दसर्याचा सण? चला तर मग...      दसर्याच्या दिवशी सकाळी सकाळी  झेंडूच्या फुलाचे तोरण घराला, दरवाजाला लावले जायचे, मग सगळ्या देवांची पुजा करून, घरातील हत्यारांची, सरस्वतीची पूजा केली जायची. यावेळीस लहान मलांच्या व'ा पुस्तकांना देखील पुजण्याची आपल्याकडे पध्दत असते, त्यामुळे ईतर दिवशी वह्या पुस्तकांना कंटाळलेली हि चिल्ली-पिल्ली दसर्याच्या दिवशी मात्र या व'ा पुस्तकांसमोर हात जोडून उभे राहताना दिसून यायची. या शुभ प्नसंगी वहिवर सरस्वतीचे चित्र काढून, त्यासोबत आपट्यांच्या पानांची पुजा देखील ही मुले अगदी मनोभावे करताना त्यांच्या चेहर्यावरील भाव अगदी निरागस असायचे. मुलांनो या दिवशी आपट्यांच्या पानांना सोनं असे संबोधले जाते. आपट्याची पानं नव्हे तर सोनं घरी...

रिअ‍ॅलिटी शो आणि......?

Image
  हल्ली प्नत्येक टी. व्ही चॅनलवर एकतरी रिअ‍ॅलिटी शो असतोच. रिअ‍ॅलिटी शो नावाच भूत आपल्या मानगुटीवर बसून बराच काळ लोटला. एका केलेल्या सर्वेक्षणानुसार हिंदी मराठी आणि अन्य प्नादेशिक वाहिन्यांवर संगीत, नृत्य, विनोद, अभिनय, साहस अशा वेगवेगळळ्या संकल्पनावर आधारित रिअ‍ॅलिटी शो सुरु आहेत. आजच्या प्नेकक्षकवर्गचा कल जास्तीत जास्त रित्या रिअ‍ॅलिटी शो बघण्याकडेच असतो. डेलिसोपच्या रांगेतुन बाहेर पडून रिअ‍ॅलिटी शो मध्ये काहितरी वेगळं, आणि हटके पाहायला मिळेल या उद्देशाने रिअ‍ॅलिटी शो बघण्याकडे प्नेक्षकांची गर्दी ासते आणि या गर्दीतील मुख्य वयोगट म्हणजेच आजची तरुणाई.    रिअ‍ॅलिटी शोची सुरवात होते ती म्हणजे त्याच्या आॅडिशन पासून मग तो डान्सचा शो असो किंवा गाण्याचा. आॅडिशन पासूनच सगळ चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळत. तेही अगदी एकरूप होऊन. आता तुम्हीच सांगा कि तिथे येणार्या प्नत्येकाचं चित्रीकरण हे दिड तासाच्या एका भागात होणं कसं शक्य आहे? तुम्ही जर आॅडिशनच्या भागावर बारकाईने लक्ष दिले तर मध्ये येणारे स्पर्धक जे असतात जणू काही ते स्वत:च हसू करायाला आल्यासारखे वागत असतात. आता हि गोष्ट वि...

स्वातंत्र कि पारतंत्र्य

देश स्वातंत्र्य होऊन ईतका काळ लोटला तरी अजूनही पारतंत्र्याच्या विळख्यात अडकल्याची भावना मनात येते. अर्थात आता ह्याला कारणे देखील तशाच प्नकारची आहेत. देशाला स्वातत्र...

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला

Image
वृत्तपत्र हे एका आरशापेक्षा कमी नसते. जगातील कानाकोप-या पासुनची इतंभूत माहिती यामध्ये वाचायला मिळते. म्हणूनच या माध्यमाला समाजाचा आरसा असे म्हटले जाते. या माध्यमाध्ये ईतर माध्यमांपेक्षा समाज बदलण्याची जास्त ताकद असते. पूर्वी एकच वृत्तपत्र एकाच जागी वाचायला मिळे, परंतु आत्ता जेवढ्या भाषा तेवढी वृत्तपत्रे अशी परिस्थिती पाहायाला मिळते. प्नादेशिक आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे जागरुक व चोखंदळ वाचक वाचताना दिसू न येतात.   सध्या अनेक भाषांतील वृत्तपत्र असल्याची आपल्याला दिसून येतात. आणि या वृत्तपत्राचा वाचक वर्ग देझील वेगवेगळा असतो. आपला वाचगवर्ग टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपल्या वृत्तपत्राकडे जास्ती जास्त वाचकवर्ग खेचण्यासाठी पत्रकाराला नाना प्नकारचे प्नयत्न करावे लागताता. त्यातील एक म्हणजे जाहिराती.. पूर्वी वृत्तपत्रामध्ये एखाद दुसरी जाहिरात असायची परंतु सध्या काळात संपूर्ण पानभर जाहिराती देण्याचा ट्रेंड सुरु आहे. वृत्तपत्राच्या खपासाठी जाहिरातींवा घेतलेल्या आधाराचा काही वेळेला अतिरेक होताना दिसतो. जाहिरातींमुळेच वृत्तपत्राच्या पानांची संख्या अवाचा थवा होऊन जाते. जाहिरातींचे कॉल्मस ...

रिमेक्सची प्लॉप हवा...

हल्ली रिमेकची हवा जोरदार सुरु आहे. एखादा चित्रपट प्नेक्षकांच्या पसंतीस उतरला कि वेगवेगळ्या भाषांत या चित्रपटांच्या रिमेकचा विचार केला जातो. पण त्या सिनेमांच्या कथान...

बातमी थोडी आणि सोंगं फार

   आपल्या मराठी साहित्यात अनेक म्हणी या आहेत, त्यातील एक म्हणेज रात्र थोडी आणि सोंगं फार.. परंतु सध्या माध्यमांधील परिस्थिती बघता या म्हणीचे थोडे विडंबन केले तर बातमी थो...

SEX आणि समाजाचा दृष्टीकोन..

Image
      " SEX" हा शब्द चार चौघात उच्चारला तरी आजूबाजूची माणसं पाप केल्यासारखं तोंडाकडे बघत बसतात . आणि जर एखाद्या मुला - मुलीने लग्नाआधी सेक्सचे संबंध ठेवले असतील तर काही विचारायलाचं नको . शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि ते संबंध पवित्र आहेत हे ठरवण्यासाठी लग्न करावं लागतं. आणि मग तेच संबंध पवित्र असं आपण म्हणतो .       लग्नाला एक वर्ष देखील पूर्ण न होता त्या जोडप्याला जेव्हा मुलं होणार हे समजल्यावर ती गोष्ट आनंदाची मानली जाते . आणि ते नैतिक देखील ठरवलं जातं. पण तेच एखादा मुलगा आणि मुलगी सलग पाच ते सहा वर्ष Relationship राहून त्यांनी संबंध ठेवले तर ते नितीविरुद्ध आहे असा Tag लाऊन आपला समाज मोकळा होतो . म्हणजेच लग्नासारख्या सो कॉल्ड पवित्र मानल्या जाणाऱ्या बंधनात मनं जुळलेली नसतानाही शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी असते. अशी आपल्या समाजाची मानसिकता आहे .     Sex हि खूप सुखद आणि आनंद देणारी गोष्ट पण त्याला आपण पवित्र अपवित्र यासारख्या संकल्पनेत का बसवतो? आपण पाश्यात संकृती स्वीकारली आहे अस म्हणतो. मग या एका मुद्यावर आलो कि क...