शुभ मंगल "सावधान"


डोक्यावर अक्षता पडण्याच्या वेळी म्हटलं जाणारं शुभ मंगल सावधान का म्हटलं  जातं. 'सावधान म्हणजे पुढे धोका आहे जाऊ नये हा असाच असतो.  एकप्रकारचा तो ईशारा असतो. तरीही आंतरपाटाच्या दोन बाजूंना असणारे ते दोघेही भटजींचा हा मंत्र अगदी हसतमुख रित्या ऐकत असतात. भटजी जणू  शक्य तितक्या कठोर, रुक्ष, मोठ्या स्वरात 'सावधान' उच्चारून  ईशारादेत असतो. पण त्या दोन व्यक्तींना आनंदाच्या आणि कौतुकाच्या माहोल मध्ये काही समजून येत नाही. आणि नकळत ते दोघेही  हव्या हव्याश्या वाटणाऱ्या No Entry मध्ये प्रवेश करतात.


     सुरवातीला सगळं छान अगदी मराठी चित्रपटातात दाखवतात ना तसं नजर लागण्याजोगं. पण जस चिंगम चघळून त्याची साखर संपून जाते त्याप्रमाणे नवीन लग्नसराई जुनी होत गेली कि तिच्यातली गोडी कधी हवेत विरून जाते त्या दोघांनाही  कळतं नाही मग रोमियोचा होतो  हिटलर आणि त्या ज्युलीएट ची होते दुधारी.  तेव्हा त्या तेव्हा त्या दोघांनाही आठवतो भटजीने म्हटलेला तो मंत्र “शुभ मंगल सावधान   
 
     तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणेन अस असे सांगणारा नवरा जेव्हा साधी साडी देखील आणून देत नाही. तेव्हा नवऱ्यासारखा दुसरा वाईट माणूस नाही असं बायको म्हणते.  तसेच लग्नाआधी तिचा एकदा हि call नाही आला तर तो अगदी वेडापिसा होतो. पण तोच लग्नानंतर तिचा सतत  आलेला Miss Call पाहून हिच्यासारखी दुसरी महामाया नाही असं तो मनात म्हणतो. आणि अशा वेळी त्या दोघांनाही पुन्हा एकदा आठवतो भटजीने म्हटलेला तो मंत्र “शुभ मंगल सावधान असा हा लग्नातला मंत्र त्या दोघांना सतत  आणि पावलोपावली आठवतं असतो.



       No Entry मध्ये गेल्यावर फाईन हा भरावा लागणारचं. पण हा संसाररूपी फाईन भरण्यासाठी प्रत्येक जण  तयार असतो. “ती” आणि “तो” संसारची दोन चाक असतात एक जरी खराब झालं तरी अख्य आयुष्य बिगडून जातं अस म्हणतात आणि ते खरचं आहे.  लग्नानंतर भले ती त्याला महामाया वाटतं असली तरीही तिच्या डोळ्यातील पाणी बघून त्याचे अवसान गळून पडते. आणि मग शेवटी युद्ध संपते आणि मिठीत उरते केवळ साखर विरघळणारी. आता तुम्हीच सांगा असा मधाळ संगम जर इथे अनुभवायला मिळणार असेल तर कोण येणार नाही अशा No Entry मध्ये.
शुभ मंगल सावधान    
# marriage 


Comments

  1. शब्दसंपत्ती...👌👌😊

    ReplyDelete
  2. खुपच छान लिहलेलं आहेस श्रुतिका😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला