SEX आणि समाजाचा दृष्टीकोन..


      "SEX" हा शब्द चार चौघात उच्चारला तरी आजूबाजूची माणसं पाप केल्यासारखं तोंडाकडे बघत बसतात. आणि जर एखाद्या मुला-मुलीने लग्नाआधी सेक्सचे संबंध ठेवले असतील तर काही विचारायलाचं नको. शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि ते संबंध पवित्र आहेत हे ठरवण्यासाठी लग्न करावं लागतं. आणि मग तेच संबंध पवित्र असं आपण म्हणतो.

     लग्नाला एक वर्ष देखील पूर्ण न होता त्या जोडप्याला जेव्हा मुलं होणार हे समजल्यावर ती गोष्ट आनंदाची मानली जाते. आणि ते नैतिक देखील ठरवलं जातं. पण तेच एखादा मुलगा आणि मुलगी सलग पाच ते सहा वर्ष Relationship राहून त्यांनी संबंध ठेवले तर ते नितीविरुद्ध आहे असा Tag लाऊन आपला समाज मोकळा होतो. म्हणजेच लग्नासारख्या सो कॉल्ड पवित्र मानल्या जाणाऱ्या बंधनात मनं जुळलेली नसतानाही शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी असते. अशी आपल्या समाजाची मानसिकता आहे.



    Sex हि खूप सुखद आणि आनंद देणारी गोष्ट पण त्याला आपण पवित्र अपवित्र यासारख्या संकल्पनेत का बसवतो? आपण पाश्यात संकृती स्वीकारली आहे अस म्हणतो. मग या एका मुद्यावर आलो कि कुठे जातो आपला फॉर्वडपणा?  पूर्वीच्या काळी १४-१५ व्या वर्षी लग्न व्हायची आणि १६ व्या वयापर्यंत ती मुलगी प्रेग्नंट राहिलेली आपल्याला चालायची मग तेविसाव्या वर्षात लग्नाआधी शरीरसंबंध ठेवलेली मुलगी  देखील आपल्या या समाजात ताठ मानेने वावरली पाहिजे.

  आपल्या समाजात  Sex या मुद्यावरून किंवा त्याची परिक्षा कशी काय केली जाऊ शकते?  या समाजात इतरही खूप गोष्टी आहेत. ज्यामुळे स्त्री पुरुष पुढे जाऊ शकतात. पण जेव्हा Sex हा मुद्दा पुढे येतो तेव्हा हा आपला समाज तितकाच मागासलेला ठरतो.
     #situation #fct #Girls #theirlife #respect #sex #natural #Beopen 

Comments

Popular posts from this blog

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

शुभ मंगल "सावधान"

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला