कॉफीचे थेंब...
लहानपणापासून आईने चहा प्यायाची सवय लावली. ती सवय आजतागायत तशीच... त्यामुळे कॉफी वैगरे पिण्याच्या फंदात मी कधी फारसे पडलेच नाही. आणि मुळात म्हणजे कॉफी वैगरे म्हंटल म्हणजे हे सगळे मोठ्या लोकांचे चोचले असच वाटत राहायचं नेहमी..
पण त्या दिवशी सकाळी अचानक आईने कॉफीचा मग समोर ठेवला आणि चहाची इतकी सवय लागली आहे कि आता त्या वासावरूनच कळलं कि आज रोजपेक्षा काहीतरी वेगळ आहे. म्हणून मी तो मग हाथात घेऊन पहिला तर त्यात वाफाळणारी कॉफी होती. सिगारेटचा धूर निघत असल्यासारखा गरम वाफा येत होत्या त्या कॉफीच्या मगमधून...
मग मी देखील कॉफीचा मग बघून आपला laptop काढला. आणि एका हाथात कॉफीचा मग आणि मांडीवर laptop घेऊन ऐटीत सोफ्यावर बसले. काही वेळानंतर खट खट खट खटाखट खट बटनांच्या आवाजा सोबत टाईपिंगच्या वेगाने डूलणारा laptop आणि कॉफीच्या नशेत धुंद असल्यासारखी मी त्या क्षणी वावरत होते.
काहीतरी लिहण्याचा प्रयन्त करत होते. जे मनात येत होतं ते सगळ laptop च्या स्क्रीनवर उमटत होतं. त्या क्षणी माझ्या मनाचे प्रतिबिंब जणू त्या laptop ची स्क्रीनच बनली होती. आधी कधीही कॉफी न प्यायलेली मी त्या दिवशी कधी त्या कॉफी मगच्या अधीन गेले माझे मलाच कळले नाही...
एक वेगळीच धुंदी, बाहेर आग ओकणारा सूर्य पण मनात सुखावणारा पाउस. असे चित्र त्यावेळेस होते. शांतता, laptop ची स्क्रीन आणि कॉफी मग यांचा उत्तम मेळ बसला होता त्या दिवशी आणि हे सगळ सुरु असताना आतून आवाज आला "झालं का गं"? मी क्षणार्धात भानावर आले तो आवाज आईचा होता..
तो पर्यंत इथे laptop ने देखील क्षीणल्यासारखी मान टाकली. माझे हाथ तसेच त्या keyboard वर अन् कॉफी मगच्या कडेवरून कडेलोट झाल्यासारखे ओघळणारे कॉफीचे ते दोन थेंब....

#Coffy #love #Tea #movie

Mstch lihlayl shuru ☕👌👌
ReplyDeleteते म्हणतात ना कॉफी आणि बरच काही......
ReplyDeleteहो अगदी बरोबर राहुल😊
ReplyDeleteछान लिहीलायस...
ReplyDeleteछान लिहीलायस...
ReplyDeleteएक कप कॉफी तु आणी मी......
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete#Coffee ani ma sagala cha ala tyat ...Mst...
ReplyDeleteखुप छान बच्चा
ReplyDeleteखुप छान बच्चा
ReplyDeleteMastch..
ReplyDeleteMast chan
ReplyDeleteShrutika masta
ReplyDelete