मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ



लहानपणी मृगजळ म्हणजे बालभारतीच्या पुस्तकातील वाळवंट आणि मृगजळाच्या आशेमागे धावणारी ती हरीण. एवढाच काय तो त्या मृगजळाचा अर्थ माहित. त्यात आपण सगळे ठरलो मुंबईतले. आणि मुंबई म्हणजे आजकाल तर पावसाचे चार महिने सोडले तरी वर्षभर हा पाऊसच असतो. त्यामुळे वाळवंट फक्त आपल्याला चित्रपटापुरतच काय ते ठाऊक. कारण जिथे  वाळवंट माहित नाही तिथे मृगजळ समजणे थोड अवघड जाणारच. पण जसे जसे मोठे होत गेलो तस तसे नव्याने मृगजळाचा अर्थ उलघडत गेला.


        मृगजळ म्हणेज भास, आभास. मग थोड मागे गेल्यावर अस कळलं कि; लहानपणी बाबा परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर एखादी नवीन गोष्ट घेऊन देणार असे Promise करायचे आणि ती वस्तू यायच्या आधीच त्या वस्तूविषयीचे भास हे सतत होत रहायचे. आणि मग ती वस्तू मिळवण्यासाठी खूप अभ्यास करायचा आणि त्या पुस्तकातल्या हरणासारखं त्या मृगजळा परी भासणाऱ्या वस्तूमागे धावत राहायचं..

    मग थोड मोठं झाल्यावर म्हणजेच कॉलेजमद्ये आल्यावर मृगजळाचा अर्थ नव्याने कळू लागला. कॉलेज म्हणजे सळसळणार रक्त, मनात एक प्रचंड उर्जा आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते. आत्मविश्वास तर असतोच. आणि त्याचबरोबर बाहेरचं जग खुणावतं असतं.  नोकरी, उत्तम जोडीदार, स्वतःच घरं अशा सगळ्या अपेक्षा मनात असतात. ज्यांच्या या अपेक्षा पूर्ण होतात ते नवीन मृगजळाच्या मागे धावतात. आणि ज्यांच्या या अपेक्षा पूर्ण होत नाहीत ते नव्याने त्या मृगजळाचा पाठलाग करतात. पण पुन्हा आपण सगळे परत मृगजळाच्या मागे हे धावतच असतो.


    मग थोडा विचार आला कि; कि अजून तर खूप मोठं व्हायचं आहे. अजून खूप गोष्टी नव्याने शिकायचा आहेत. आयुष्यात अजून असे खूप मृगजळ येतील त्या मागे धावायचे आहे. अपेक्षा खूप वाढतील, गरजा हि वाढतील. आणि त्यावेळेस "तिथे रणरणत वाळवंट नसेल, आणि तहानही नसेल, तिथे फक्त असेल भूक जी कधीही न संपणारी."
#age #childhood

                                                                                                                                      -Shrutika Sawant..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शुभ मंगल "सावधान"

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला