"M" For "Miड्ल क्लास"

      एक तर माणसानं गरीब तरी असावं  किंवा खूप श्रीमंत तरी असावं पण मिड्ल क्लास मात्र असू नये. कारण मिड्ल क्लास लोकांची परिस्थिती म्हणजे म्हणजे अवघड जागेच दुखण जे सांगताही येत नाही आणि लपवता देखील येत नाही. गरीब भिक मागून गुजारा करतो. आणि आपल्या श्रीमंतांचे तर थाटाचं वेगळे.  पण तरीही कितीही आणि काहीही झालं तरी Miड्ल क्लास माणूस हा बेस्टच असतो कस ते आपण पाहूया 

      हो कारण त्याला आवडतं मांडी मारून जेवण्याच्या पंगतीत बसायला, त्याला आवडतं ट्रेनच्या गर्दीत रोज लटकायला. तो एकाचवेळी अनेक गोष्टी करतो, एकीकडे भिकाऱ्याला चिल्लर तर दुसरीकडे, अंबानीच्या संपत्तीची चर्चा करत असतो .रोज डब्यातली बटाट्याची भाजी खाऊन तो कंटाळतो, पण तोच पावा मधला बटाटावडा मात्र आवडीने खातो. त्याला काट्या चमच्याने  खाणे जमतच नाही कारण आपल्या पाच बोटांशिवाय त्याची भूक कधी भागत नाही. घरी आल्यावर आपल्या बायका मुलांवर चीड-चिड करण म्हणजे त्याचा जन्मसिद्ध हक्कच असतो, पण त्याचं लोकांसाठी काय करता येईल याचा विचार मात्र तो सतत करत बसतो. थोडीशी घासाघीस केल्याशिवाय त्याची कधी खरेदी पूर्ण होतचं  नाही. आणि रिक्षावाल्याशी सुट्ट्या पैश्यांसाठी भांडल्याशिवाय त्याचा दिवस काही संपत नाही. पावसात जुन्या छत्र्याचं वापरतो. आणि तुटलेली चप्पल किमान दोन तीन वेळा तरी शिवून घालतो. Cricket च्या stadium चं तिकीट त्याला कधी परवडतं नाही. पण T.V वरची Live Match बघणं तो कधीचं सोडत नाही. महिन्याची पहिली तारीख म्हटली कि झिरो झालेला Bank Balance आठवतो. पण मिळालेला पगार सगळ्यात आधी देवासमोर ठेवतो. जगताना शर्यतीत तो सुद्धा धावतो, आणि डोक्यावर कितीही भार असला तरी आपल्या कुटुंबासोबत असताना तो नेहमी निश्चिंत असतो. 


    असा हा मिड्ल क्लास माणूस पैशावर कधीच माणसं तोलतं नाही 
क्लास पाहून तो कधीच माणसं जोडत नाही. 

म्हणूनचं  Miड्ल क्लास माणूस हा नेहमी बेस्ट असतो.
#common_peoples #life #experience #thaughts #Think #lifestyle 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

शुभ मंगल "सावधान"

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला