नवरात्रीचे नऊ दिवस संपले की, चाहूल लागते ती दसर्याची. नऊ दिवसाची लगबग थोडीशी कमी होते, आणि उजाडतो दसर्याचा दिवस. दसर्याचा हा दिवस प्नत्येकजण आपापल्या पध्दतीने साजरा करत असतो. यांत्रिकीकरण झालेल्या या युगात पुर्वीसारखा लहान मुलांमध्ये दसर्याचा उत्साह दिसून येतं नाही. काय मग मुलांनो जाणून घ्यायचयं का कसा साजरा व्हायचा दसर्याचा सण? चला तर मग...  
   दसर्याच्या दिवशी सकाळी सकाळी  झेंडूच्या फुलाचे तोरण घराला, दरवाजाला लावले जायचे, मग सगळ्या देवांची पुजा करून, घरातील हत्यारांची, सरस्वतीची पूजा केली जायची. यावेळीस लहान मलांच्या व'ा पुस्तकांना देखील पुजण्याची आपल्याकडे पध्दत असते, त्यामुळे ईतर दिवशी वह्या पुस्तकांना कंटाळलेली हि चिल्ली-पिल्ली दसर्याच्या दिवशी मात्र या व'ा पुस्तकांसमोर हात जोडून उभे राहताना दिसून यायची. या शुभ प्नसंगी वहिवर सरस्वतीचे चित्र काढून, त्यासोबत आपट्यांच्या पानांची पुजा देखील ही मुले अगदी मनोभावे करताना त्यांच्या चेहर्यावरील भाव अगदी निरागस असायचे. मुलांनो या दिवशी आपट्यांच्या पानांना सोनं असे संबोधले जाते. आपट्याची पानं नव्हे तर सोनं घरी आलेलं असायचं. आधी देवबप्पाला आणि मग नंतर मोठ्यांना हे सोनं देऊन हि चिल्ली-पिल्ली सगळीकडे सोनं वाटण्यासाढी छान छान कपडे घालून तयार होतं असे. त्यांना या बदल्यात  कोणी आशीर्वाद देत, तर कोणी गोड गोड खाऊ, तर कोणी छान छान भेटवस्तू. त्यांचे ते चिमुकले हात सोन्यांच्या पानांनी भरुन जाई. मिळालेल्या चॉक्लेट्स, गोळ्यांनी या चिमुकल्यांच्या आनंदाला कशाचीही तोड राहत नसे. काही ठिकाणी छोट्या-छोट्या कुमारिकांचे पाय धुऊन, हळद-कुंकू , भेटवस्तू देऊन त्यांचे पूजन केले जायचे, जेव्हा मोठ्या मोठ्या बायका त्यांच्या ईवलुश्या पायांना हात लाऊन नमस्कार करायच्या तेव्हा तर या लहान मुलींच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा असे. दसर्याच्या दिवशी आणखी एका गोष्टीच कौतुक या लहान मुलांमध्ये कौतुक असायचे ते म्हणजे ‘‘रावणदहन’’ दहा तोडांच्या महाकाय रावणाला जळताना पाहून कार्टून मधीलं एखादं विलन कॅरेक्टरला मारल्यावर जो उत्साह असतो, त्याप्रकारे पुतळ्याला जळताना पाहून हि चिल्ली-पिल्ली उड्या मारून धम्माल करत असे. आणि या दिवशाची सांगता आजी- आजोबांच्या मांडीवर डोकं ठेऊन रावणदहनाची गोष्ट ऐकत या पिटुकल्यांचा सण संपन्न होतं असे.
  काय मग मुलांनो मज्जा आली ना हा लेख वाचून? चला तर मग थोडं त्या मोबाईलच्या अ‍ॅप मधून बाहेर निघुन यावर्षीचा दसरा जरा हटके पध्दतीने साजरा करुया. 



Comments

Popular posts from this blog

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

शुभ मंगल "सावधान"

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला