रिमेक्सची प्लॉप हवा...

हल्ली रिमेकची हवा जोरदार सुरु आहे. एखादा चित्रपट प्नेक्षकांच्या पसंतीस उतरला कि वेगवेगळ्या भाषांत या चित्रपटांच्या रिमेकचा विचार केला जातो. पण त्या सिनेमांच्या कथानकापासून ते अगदी डायलॉग पर्यंत सगळ्याच गोष्टी ह्या तशाच्या तशा बनवल्या जातात. अर्थात रिमेक म्हटल्यावर ह्या गोष्टी साहजिकचं आहेत. हल्ली रिमेक करताना तप सिनेमा रिमेकच्या मुळ चित्रपटाईतकाच दर्जेदार होताना दिसून येतं नाही याऊट तो बॉक्स आॅफिसवर तेवढाच धाडकान आपटताना दिसतो.

  काही सिनेमे वगळता; बहुतांश रिमेक सिनेमे हे तोंडावरच आपटतात. याच. ताज उदाहरण म्हणजे १०० कोटींहून अधिक गल्ला करणारा नागराज मंजुळेंचा सैराटचा हिंदी रिमेक धडक हा बॉक्सआॅफिसवर चालताना दिसला नाही. या नंतरचं आणखी एक उदाहरण म्हणजे; बाहुबली सारख्या सिनेमाला प्नेक्षकाकांनी अगदी डोक्यावर घेतलं. परंतु ह्याचं सिनेमाचा रिनेमाच्या रिमेकला चीनमध्ये तिकासा प्नतिसाद मिळताना दिसला नाही. हि झाली आत्ताची उदाहरणं. आता थोडे मागे जावून पाहिलं तर अशा फ्लॉप सिनेमांची रांगच दिसेल. मध्यंतरीच्या काळात बॉलीवुड काळात मधील ५ दर्जेदार सिनेमांचे तमिळमध्ये रिमेक करण्यात आले. परंतु त्याही सिनेमांना प्नेक्षकांडून योग्य ती दाद मिळाली नाही व तेही सिनेमे फ्लॉप च्या यादीत गणले गेले..

  सिनेमाचा रिमेक बनवणं म्हणजे सगळ्यात सोप्प कामं असं समजलं जातं. परंतु एखाद्या मुळ वस्तुसारखी दुसरी तशाच धाटणीची वस्तू बनवणं हे कठीणं असतं त्याचं प्नकारे एखाद्या मूळ सिनेमासाचा रिमेक बनवणे हे तेवढेचं कठीण काम आहे. सध्या दिगदर्शकांवा रिमेक बनवण्याकडे जास्तीच जास्त काल असल्याचे दिसून येतयं. परंतू रिमेकच्या नादात आजचा दिगदर्शक कॉपी-पेस्ट मध्ये अडकत चाललेला आहे असं दिसतयं. सध्याचे हे चित्र पाहता कितीही रिमेक उत्तम असला तरिही ओरिजनल ते शेवटी ओरिजनल हे सिनेमागृगातून बाहेर पडताना प्नेक्षकांच्या तोंडातून निघतचं. आणि रिमेक सिनेमा शेवटी फ्लॉपच्या यादीत भर पाडतो हे मात्र खरं

Comments

Popular posts from this blog

मृगजळ आणि त्याचे वयानुसार बदलते अर्थ

शुभ मंगल "सावधान"

वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींचा बोलबाला