बातमी थोडी आणि सोंगं फार
आपल्या मराठी साहित्यात अनेक म्हणी या आहेत, त्यातील एक म्हणेज रात्र थोडी आणि सोंगं फार.. परंतु सध्या माध्यमांधील परिस्थिती बघता या म्हणीचे थोडे विडंबन केले तर बातमी थोडी अणि सोंगं फार हि नवी म्हण काही काळातच सुरु होईल कि काय असं वाटतयं खरतरं या लेखाच्या शिर्षकामधूनच थोडा फार अंदाज हा आला असेलचं तर आता जास्त प्रस्तावना न देता मी सरळ मुद्दयालाच हाथ घालते.
पत्रकारितेला लोकशाहिचा चौथा स्तंभ असे म्हटंले जाते, परंतु सध्या सुरु असलेले माध्यामांचर चित्र पाहाता हा चौथा स्तंभ अजून किती काळ मजबूत राहणार आहे हे कोणास ठाऊक? पूर्वी एखादी घडना घडली कि त्या बातमीवरील वृत्त वाचण्यासाठी अगदी दुस-या दिवशीच्या वर्तमानपत्राची वाट पाहावी लागत असे, हे तुम्हा आम्हाला सगळ्यांच ठाऊक आहे. परंतू सध्या डिजीटल च्या जमान्यात लगेचच एखाद्या घटनेवरील बातमी काही क्षणातच आपल्या पर्यंत येऊन पोहचते. पण सध्या माध्यमांचे स्वरुप पाहाता बातमी पोहचते म्हणण्यापेक्षा आपल्या समोर येऊन अक्षरशा: धडकते हे म्हणने जास्त सोयीचे ठरेल. हे म्हणण्याचे कारण म्हणजे ज्या सनसनाटी पध्दतीने बातमीचे सादरिकरण केले जाते. कि त्यनुळे बातमी हि बातमी न राहाता तीचे रुपांतर हे लघू चित्रपटामध्ये होईल कि काय असे वाटते. हि झाली सादरिकरणाची गोष्ट.
आता जरा वळूया एखाद्या बातमीचा पाठपुरवठा आजकालची माध्यमे कशा प्नकारे करतात, बातमीचा पाठपुरवठा हा तर त्या बातमीचा एक भाग असतो पण सध्याची माध्यमे जोपर्यंत दुसरी एखादी सनसनाटी बातमी येत नाही तोपर्यंत हाथी असलेल्या बातमीवा अगदी पिच्छा पुरवतात, सतत त्याच घटनेवर दिवस रात्र चर्चा भरवल्या जातात, लोकांचे मत जाणून घेतले जाते. पण या सगळळ्यांनी साध्य मात्र काहिच होतं नाही. त्या बातमीला पुर्णविराम न मिळता मिळते केवळ प्नश्नचिन्ह.. टी. आर. पी च्या युगात प्नेकक्षवर्ग आपल्याकडे खेचण्यासाठी हि माध्यमे कोणत्याही थराला जाऊ शकतात हे खरं. एखादा पदार्थ चविष्ट होण्यासाठी त्यात मीठ, मसाला लाऊन तो पदार्थ रुचकर बनवला जातो, त्याच प्नमाणे बातमी देखील प्नसिध्द होण्यासाठी तिला अनेक प्नकारचे पदर जोडले जातात.
या सगळ्यामुळे बातमीचा मुळ उद्देश लोकांना जागृत करून सत्य परिस्थितीची जाणीव करुन देणे हा असतो. पण अजेंटा सेटिंग असो किंवा माध्यमांचे बाजारीकरण असो या अशा कारणामुळे बातम्यांचा मुळ उद्देश हा मागे पडत चाललेला आहे हे मात्र खरं..
Aaha kya baat सत्यस्तिथी 😊👍
ReplyDelete