रिअॅलिटी शो आणि......?
हल्ली प्नत्येक टी. व्ही चॅनलवर एकतरी रिअॅलिटी शो असतोच. रिअॅलिटी शो नावाच भूत आपल्या मानगुटीवर बसून बराच काळ लोटला. एका केलेल्या सर्वेक्षणानुसार हिंदी मराठी आणि अन्य प्नादेशिक वाहिन्यांवर संगीत, नृत्य, विनोद, अभिनय, साहस अशा वेगवेगळळ्या संकल्पनावर आधारित रिअॅलिटी शो सुरु आहेत. आजच्या प्नेकक्षकवर्गचा कल जास्तीत जास्त रित्या रिअॅलिटी शो बघण्याकडेच असतो. डेलिसोपच्या रांगेतुन बाहेर पडून रिअॅलिटी शो मध्ये काहितरी वेगळं, आणि हटके पाहायला मिळेल या उद्देशाने रिअॅलिटी शो बघण्याकडे प्नेक्षकांची गर्दी ासते आणि या गर्दीतील मुख्य वयोगट म्हणजेच आजची तरुणाई.
रिअॅलिटी शोची सुरवात होते ती म्हणजे त्याच्या आॅडिशन पासून मग तो डान्सचा शो असो किंवा गाण्याचा. आॅडिशन पासूनच सगळ चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळत. तेही अगदी एकरूप होऊन. आता तुम्हीच सांगा कि तिथे येणार्या प्नत्येकाचं चित्रीकरण हे दिड तासाच्या एका भागात होणं कसं शक्य आहे? तुम्ही जर आॅडिशनच्या भागावर बारकाईने लक्ष दिले तर मध्ये येणारे स्पर्धक जे असतात जणू काही ते स्वत:च हसू करायाला आल्यासारखे वागत असतात. आता हि गोष्ट विचार करण्यासारखी आहे कि; एवढ्या मोठ्या नॅशनल चॅनलवर का कोण आपल्यावर हसू ओढावून घेईल. हे तर स्वत:च्या पायावर कु-हाड मारुन घेण्यासारखा प्नकार आहे.
साहस दाखवणारया रिअॅलिटी शो मध्ये दाखवणार्या स्टंट मुळे बघणार्यांचा थरकाप उडतो, पण तिथे खेळणार्या स्पर्धकाला काहिच होतं नाही. असं का? याचा विचार करण्यासारखा आहे. ‘‘तुमच्या लाडक्या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर वोट करा हे वाक्य हमखास आपल्याला रिअॅलिटी शो मध्ये पाहायाला व ऐकायाला मिळत’’ आता खरचं आपल्या वोटमुळे हे स्पर्धक जिंकून येत असतील का? हा तर रिअॅलिटी शो बाबत पडलेला मोठा प्नश्न आहे.
असे एक ना अनेक प्नश्न हे रिअॅलिटी शोच्या बाबतीत पडतात. रोजच्या डेलिसोपला कंटाळलेला हा प्रक्षक वर्ग त्यातून बाहेर पडून रिअॅलिटी शोकडे वळलेला आहे. आणि ह्या अशा शो सोबत प्नेकक्षकवर्ग हा भावनीक रित्या जोडला गेलेला असतो, परंतु रिअॅलिटी शो मध्ये दाखवणारं हे सत्य कितपत सत्य असतं हे त्याचं त्यांना ठाऊक?

सत्यस्तिथी...😊👍👍
ReplyDelete